“बहाउल्लाह यांनी जगातील सर्व धर्माच्या लोकांसाठी प्रार्थना स्थळ बांधायची आज्ञा दिली आहे; असे स्थळ जिथे सर्व धर्मांचे, वंशांचे व पंथांचे लोक एका वैश्विक छत्रछायेखाली एकत्र येऊ शकतील; जिथे खुल्या पवित्र वातावरणात मानवजातीच्या एकत्वाची घोषणा गुंजत राहील.”अब्दुल-बहा

बहाई अनुयायांसाठी उपासनामय जीवन, प्रार्थना आणि ध्यान हे फक्त वैयक्तिक समाधानासाठी नसते, कारण ते प्रत्येक व्यक्ती व संपूर्ण समाजाला आपली आध्यात्मिक उर्जा कृतीत आणून जगाचे हित साधण्यास प्रेरणा देते.

उपासना व सेवा यातील संबंधांची जाणीव झाल्यावर प्रार्थना कृतीत उतरतात आणि कृती आध्यात्मिकतेने भारल्या जातात. त्यामुळे आध्यात्मिक मार्ग व्यावहारिक पावलांनी चालणे शक्य होते. उपासना आणि सेवा यातील परस्परसंबंध दृढ असलेले समाज-जीवन भारतातील खेड्यांत आणि वस्त्यांमध्ये घडविले जात आहे.

उपासना आणि सेवा हे बहाई जीवनाचे दोन घटक नवी दिल्लीमधील ‘कमळ मंदीर’ या बहाई प्रार्थना स्थळातही एकत्र नांदताना दिसतात. या प्रार्थना मंदिरात एक मध्यवर्ती प्रार्थना सभागृह आहे आणि त्याला नऊ प्रवेशद्वारे आहेत, जे धर्मांच्या एकतेचे प्रतीक आहे आणि त्यातून असे सूचित होते की सर्व प्रेषितांची आणि ईश्वरी अवतारांची शिकवण म्हणजे एकाच सत्त्याकडे नेणारी द्वारे आहेत. मंदिराच्या सभोवताली ज्या बागा आहेत त्यांच्यामुळे येथे येणाऱ्या पाहुण्यांच्या उपासनेसाठी आध्यात्मिक वातावरण निर्माण होते. मंदिराच्या परिसरात भौतिक गरजा आणि शैक्षणिक सुविधा पुरवणाऱ्या संस्था निर्माण होतील असे योजलेले आहे. मंदिरातील निरंतर प्रार्थना व ध्यानधारणा यामुळे जी चैतन्यमय भावना निर्माण झाली आहे, ती दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्र आणि त्याच्या जवळपासच्या भागात, एक माध्यम बनून समाज उभारणीच्या उपक्रमांच्या सतत वाढीमध्ये दर्शवित आहे.

 
Scroll Up