bahai india banner the bab

महात्मा बाब

“मी सर्व निर्मित सृष्टीच्या उत्पत्तीचा केंद्रबिंदु आहे. मी त्या परमेश्वराच्या चेहऱ्याची उज्वलता आहे जी कधीच झाकोळता येणार नाही, परमेश्वराचा प्रकाश आहे ज्याची तेजस्विता कधीच मंद होणार नाही.”

- महात्मा बाब

जगाच्या इतिहासात १९व्या शतकाचा मध्यकाल खळबळजनक होता जेव्हा एका तरुण व्यापाऱ्याने जाहीर केले की मानवी जीवनात परिवर्तन करणारा संदेश घेऊन तो आला आहे. त्या काळी त्याच्या इराण ह्या देशात नैतिक अध:पतन होत होते. त्याच्या संदेशाने सर्व स्तरांमध्ये उत्साह आणि आशेची लहर उसळली. त्याला वेगाने हजारो अनुयायी मिळाले. त्याने ‘बाब’ (अरेबिक भाषेत ‘द्वार’) हे नाव धारण केले.

त्यांनी आध्यात्मिक आणि नैतिक परिवर्तनासाठी आवाहन केले. स्त्रिया आणि गरीब जनतेची परिस्थिती सुधारण्याकडे लक्ष वेधले. आध्यात्मिक परिवर्तनाचा त्यांचा हा संदेश क्रांतिकारी होता. त्याच सुमारास त्यांनी एका स्वतंत्र धर्माची स्थापना केली आणि आपल्या अनुयायांना चांगल्या कार्यांनी आपले जीवन उजळविण्यास प्रेरित केले.

महात्मा बाब यांनी जाहीर केले की मानवता एका नव्या युगाच्या उंबरठ्याशी उभी आहे. त्यांचे ध्येय-कार्य जे फक्त सहा वर्षे चालले, ते म्हणजे, जगातील सर्व धर्मांमध्ये भाकीत केल्याप्रमाणे, शांती आणि न्यायाचे युग घेऊन येणाऱ्या ईश्वरी अवताराचा मार्ग सुकर करणे. ते येणारे देवावतार म्हणजे बहाउल्लाह!

Exploring this topic: