विसाव्या शतकाच्या सुरुवातीला बहाउल्लाह यांचे ज्येष्ठ पुत्र अब्दुल-बहा हे बहाई धर्माचे प्रमुख प्रसारक होते. ते सामाजिक न्याय आणि जागतिक शांती यांचे पुरस्कर्ते म्हणून सर्वमान्य होते.
एकता हे बहाउल्लाह यांच्या शिकवणीचे मूलभूत तत्व होते आणि ते अबाधित ठेवण्यासाठी त्यांनी पूर्ण काळजी घेतली. धर्मसंस्थापकाच्या मृत्यूनंतर काही धर्मांची शकले झाली होती आणि तशी वेळ आपल्या धर्मावर कधीही येऊ नये म्हणून त्यांनी काही नियम घालून दिले. त्यांच्या लेखनातून, बहाउल्लाह ह्यांनी सर्वांना असा निर्देश दिला की त्यांचे ज्येष्ठ पुत्र अब्दुल-बहा हे बहाई पवित्र लिखाणाचा अर्थ लावण्यास अधिकृत असतील आणि बहाई शिकवणींचे आदर्श रूप मानले जातील.
बहाउल्लाह यांच्या स्वर्गारोहणानंतर अब्दुल-बहा यांची नीतीमत्ता, त्यांचे ज्ञान आणि त्यांची मानवतेची सेवा यातून बहाउल्लाहांची शिकवण आचरणात आणण्याचा वस्तुपाठ मिळाला, ज्यामुळे साऱ्या जगात वेगाने पसरणाऱ्या बहाई धर्माला मोठा सन्मान प्राप्त झाला.
अब्दुल-बहांनी आपली कारकीर्द आपल्या वडिलांची धर्मश्रद्धा आणि शांती, एकता या आदर्शांचा प्रसार करण्यात व्यतीत केली. त्यांनी स्थानिक बहाई संस्थांच्या स्थापनेस उत्तेजन दिल; नवजात शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक कार्यांचे मार्गदर्शन केले. आजन्म बंदिवासातून सुटका झाल्यावर अब्दुल-बहा प्रवासाला बाहेर पडले आणि इजिप्त, यूरोप आणि उत्तर अमेरिकेला भेटी दिल्या. आयुष्यभर त्यांनी लहान थोर सर्वांना समाजाचे आध्यात्मिक आणि सामाजिक नूतनीकरण करण्याचा बहाउल्लाह यांचा मार्ग अतिशय साधेपणाने दाखविला.
Exploring this topic:
- The Life of ‘Abdu’l-Bahá
- The Significance of ‘Abdu’l-Bahá
- The Development of the Bahá’í Community in the time of ‘Abdu’l-Bahá
- Quotations
- Articles and Resources