जगाचे एकत्रीकरण करण्याचा आपल्या अवताराचा उद्देश सफल व्हावा आणि बहाई समाजाची एकजूट अबाधित रहावी यासाठी बहाउल्लाह यांनी आपल्या करारनाम्याचे केंद्रबिंदु म्हणून अब्दुल-बहा यांची नेमणूक केली आणि विश्व न्याय मंदिराच्या स्थापनेचा आदेश दिला. त्यानंतर, अब्दुल-बहा यांनी विश्व न्याय मंदिराच्या कामकाजाची तत्वे मांडली आणि असे जाहीर केले की त्यांच्या निधनानंतर त्यांचे ज्येष्ठ नातू शोघी एफेंदी हे बहाई धर्माचे धर्मसंरक्षक म्हणून कार्य करतील आणि बहाई समुदायाने त्यास अनुसरावे.
धर्मतत्वांचे पालन करणे, नियमांचा प्रसार करणे, संस्थांची काळजी घेणे आणि समाज सतत प्रगतीशील असावा या दृष्टीने बहाई धर्म आचरणे ही जबाबदारी विश्व न्याय मंदिर आणि धर्मसंरक्षक या दोघांवरही आली.
असामान्य दूरदृष्टी, शहाणपण आणि भक्ती यांच्या बळावर सुमारे ३६ वर्षे शोघी एफेंदी यांनी पद्धतशीरपणे प्रगती, सखोल ज्ञान आणि बहाई समुदायाची बळकट एकजूट जोपासली, ज्यामुळे संपूर्ण मानवजातीची विविधता समुदायात मोठ्या प्रमाणात दिसून येत लागली.
बहाई समाजाच्या कार्याचे व्यवस्थापन करण्याची बहाउल्लाह यांनी रचलेली खास पद्धत शोघी एफेंदी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व जगात वेगाने विकसित झाली. त्यांनी बहाई पवित्र ग्रंथांचे इंग्रजीत भाषांतर केले, पवित्र भूमीत बहाई आध्यात्मिक आणि प्रशासकीय केंद्र उभारले. त्यांनी लिहिलेल्या हजारो पत्रांतून त्यांनी समाजसुधारणेच्या आध्यात्मिक स्वरूपाला आणि गतीला एक प्रगल्भ अंतर्दृष्टी दिली, मानवता ज्या भविष्याकडे वाटचाल करत आहे त्याचे एक छान स्फूर्तिदायी दर्शन घडवले.
Exploring this topic:
- The Life and Work of Shoghi Effendi
- Guidance and Translations
- Shoghi Effendi’s Passing
- Quotations
- Articles and Resources