bahai india banner universal house of justice

विश्व न्याय मंदिर

“परमेश्वराच्या न्याय मंदिराच्या सभासदांवर लोकांच्या योगक्षेमाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सत्यत:, ईश्वराच्या सेवकांमध्ये ते त्याचे विश्वस्त आणि त्याच्या देशांमध्ये अधिकाराची उदयस्थाने आहेत.”

- बहाउल्लाह

विश्व न्याय मंदिर हे बहाई धर्माचे आंतरराष्ट्रीय शासकीय मंडळ आहे. ‘किताब-ए-अकदस’ या आपल्या पवित्र ग्रंथात बहाउल्लाह यांनी या संस्थेची निर्मिती करण्याचा आदेश दिला आहे.

विश्व न्याय मंदिरात नऊ सभासद असतात जे दर पाच वर्षांनी सर्व बहाई राष्ट्रीय सभांच्या सभासदांकडून निवडले जातात. बहाउल्लाह यांनी विश्व न्याय मंदिरावर मानवजातीच्या कल्याणासाठी सकारात्मक प्रभाव टाकणे; शिक्षण, शांतता आणि जागतिक समृद्धीस चालना देणे; मानवी प्रतिष्ठा आणि धर्माचे स्थान अबाधित राखणे अशा पवित्र कार्यांचे अधिकार सोपवले आहे. या संस्थेवर सतत प्रगत होणाऱ्या समाजाच्या गरजांप्रमाणे बहाई विचारांचा वापर करण्याची जबाबदारी सोपविली आहे आणि अशा प्रकारे बहाई पवित्र ग्रंथांत स्पष्टपणे न मांडलेल्या बाबींवर कायदे बनवण्याचे अधिकार विश्व न्याय मंदिरास दिले आहेत.

सन १९६३ मध्ये पहिली निवडणूक झाल्यापासून ‘एक संपन्न जागतिक संस्कृती घडविण्यात सहभागी होण्याची क्षमता कशी वाढवावी’ यासंबंधी विश्व न्याय मंदिराने बहाई समुदायास मार्गदर्शित केले आहे. या मार्गदर्शनामुळे बहाई समुदायाच्या विचार व कृतीत एकवाक्यता येते आणि तो बहाउल्लाह यांचे विश्वशांतीचे विचार कृतीत आणायला शिकतो.

Exploring this topic: